Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपरी-चिंचवडवर पुन्हा एकदा ‘कमळ’ फुललं! राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची ऐतिहासिक मुसंडी; अजितदादांना मोठा धक्का

पिंपरी-चिंचवडवर पुन्हा एकदा ‘कमळ’ फुललं! राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची ऐतिहासिक मुसंडी; अजितदादांना मोठा धक्का

Pimpri Chinchwad Election Result 2026: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेर भारतीय जनता पक्षाने निर्भेळ यश मिळवत आपली सत्ता राखली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपने घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत बहुमताचा ६५ हा आकडा सहज पार केला आहे. या निकालामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (एकत्रित पॅनल) त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.

प्रभाग ३: विमाननगर-लोहगावची चुरस

या हाय-प्रोफाइल प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली:

  • अ गट: राष्ट्रवादीच्या उषा कळमकर यांनी भाजपच्या श्रेयस खांदवे यांचा पराभव करत बाजी मारली.
  • ब गट: भाजपच्या अनिल सातव यांनी राष्ट्रवादीच्या सुनील खांदवे यांना पराभूत केले.
  • क गट: भाजपच्या ऐश्वर्या पाटील यांनी उज्ज्वला खांदवे यांचा पराभव करत विजय मिळवला.
  • ड गट: राष्ट्रवादीच्या बंडू खांदवे यांनी भाजपच्या रामदास दाभाडे यांच्यावर मात केली.

निकालाचे मुख्य पैलू

अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांनी या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी हातमिळवणी केली होती, मात्र मतदारांनी पुन्हा एकदा भाजपच्या विकासाला कौल दिल्याचे दिसत आहे. मुंबईत आणि पुण्यात काही प्रमाणात प्रभाव असलेल्या ठाकरे गट आणि मनसेला पिंपरी-चिंचवडमध्ये खाते उघडण्यासाठीही संघर्ष करावा लागला. मतदानापूर्वीच भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपचे मानसिक बळ सुरुवातीपासूनच उंचावलेले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!