Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

AIMIM Wins in Municipal Election: ‘एमआयएम’ची अनेक महापालिकांत जोरदार मुसंडी; छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक 24 नगरसेवक विजयी

AIMIM Wins in Municipal Election: ‘एमआयएम’ची अनेक महापालिकांत जोरदार मुसंडी; छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक 24 नगरसेवक विजयी

AIMIM Municipal Election in Chhatrapati Sambhajinagar: राज्यभरात महापालिका निवडणुकीत भाजप जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी एमआयएमने देखील अनेक जागांवर जोरदार मुंसडी मारली आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार 29 पैकी 13 महापालिकांत एमआयएमचे 95 नगरसेवक विजयी झाले आहेत.

विशेष म्हणजे शिवसेना-भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे सर्वाधिक २४ उमेदवार विजयी झाले आहेत. या ठिकाणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती. प्रचारादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचीही घटना घडली होती.

याशिवाय, मालेगावमध्ये एमआयएमचे २० उमेदवार विजयी झाले असून, सोलापूर, धुळे,नांदेडमध्ये प्रत्येकी ८ असे २४ उमेदवार विजयी झाले आहेत. याचबरोबर मुंबईत एमआयएमचे आतापर्यंत ६ नगरसेवक विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. समाजवादी पार्टीला मागे सारत एमआयएमची सरशी झाल्याचे चित्र आहे. याचबरोबर एमआयएमचे अमरावतीत ६, ठाण्यात ५, नागपुरात ४ नगरसेवक विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे.

तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. तर त्या पाठोपाठ शिवसेना दुसऱ्या क्रमामांकवर आहे. दुसरीकडे ठाकरे गट मात्र तिसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या दोन्ही मुलांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.

प्रभाग क्रमांक १८ मध्ये हर्षदा शिरसाट या विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक २९ मधून सिद्धांत शिरसाट विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे हे मात्र प्रभाग क्रमांक १६ मध्ये पराभूत झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!