Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अखेर संपाला ब्रेक! शिक्षक संघटनांच्या लढ्याला मोठं यश; पेन्शनवर १५ दिवसांत निर्णयाचं आश्वासन

अखेर संपाला ब्रेक! शिक्षक संघटनांच्या लढ्याला मोठं यश; पेन्शनवर १५ दिवसांत निर्णयाचं आश्वासन

Teacher Strike News : राज्यभर चार दिवस खळबळ उडवणारा सरकारी कर्मचारी व शिक्षकांचा बेमुदत संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर संघटनांनी हा निर्णय घेतला असून, आरोग्य विभाग शनिवारपासून तर सर्व शासकीय कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहेत.

२१ एप्रिलपासून सुरू झालेल्या या संपात विविध कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारने काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. विशेषतः पेन्शनचा मुद्दा निर्णायक ठरला असून, सुधारित निवृत्तीवेतन योजनेबाबत १५ दिवसांत अधिसूचना काढण्याचे लेखी आश्वासन सरकारने दिले आहे.

या आश्वासनानंतर संघटनांनी संप स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर आणि अध्यक्ष अशोक दगडे यांनी याची अधिकृत घोषणा केली.

काय मान्य झालं?

दर तीन महिन्यांनी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक
चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक भरती प्रक्रियेला गती
आरोग्य विमा योजनेबाबत सकारात्मक विचार
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी नियमित समन्वय यंत्रणा

दरम्यान, १ मार्च २०२४ पासून लागू झालेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना अद्याप निघाली नसल्यामुळे सुमारे ६५०० निवृत्त कर्मचारी-शिक्षकांना तात्पुरते लाभ मिळालेले नाहीत. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. याच मुद्द्यावर सरकारने पंधरा दिवसांत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

तथापि, काही कर्मचारी वर्गात अजूनही नाराजी आहे. “लढा अर्धवट सोडला” अशी टीका होत असून, पुढील काळात पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, २५ एप्रिलपासून आरोग्य सेवा पूर्ववत सुरू झाली असून, २७ एप्रिलपासून सर्व शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार आहेत. चार दिवस ठप्प असलेले कामकाज आता पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. हा संप जरी स्थगित झाला असला तरी पेन्शनच्या अधिसूचनेवरच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!