Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Thane Shivshahi Fire: ठाणे स्टेशनवर थरार! चालत्या ‘शिवशाही’ने घेतला पेट; बस जळून खाक, 15 प्रवासी…

Thane Shivshahi Fire: ठाणे स्टेशनवर थरार! चालत्या ‘शिवशाही’ने घेतला पेट; बस जळून खाक, 15 प्रवासी…

Thane Shivshahi Fire: ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गजबजलेल्या सॅटिस (SATIS) पुलावर गुरुवारी एका ‘शिवशाही’ बसला भीषण आग लागली. बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील १५ ते २० प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात यश आले, ज्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली आहे.

नेमकी घटना कशी घडली?
सदर शिवशाही बस ठाणे स्थानकावरून पालघर-बोईसरच्या दिशेने जाण्यासाठी निघाली होती. बस सॅटिस ब्रिजवर पोहोचताच इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. बसने भीषण पेट घेतल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीची भीषणता एवढी होती की, पाहता पाहता संपूर्ण बस जळून खाक झाली.

बचावकार्य आणि संभाव्य कारण
आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग बसमधील इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे ठाणे स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते आणि वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. शिवशाही बसला आग लागण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आता बसच्या तांत्रिक देखभालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!