Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार? राहुरी पोटनिवडणुकीच्या दिवशीचं केला मोठा खुलासा

Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार? राहुरी पोटनिवडणुकीच्या दिवशीचं केला मोठा खुलासा

Prajakt Tanpure: अजित पवार यांच्या निधनानंतर आज बारामतीसह राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. राहुरीतून अनपेक्षितपणे माघार घेतल्यामुळे चर्चेत आलेले शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर आपल्या राजकीय भूमिकेबाबत मौन सोडले आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचाच निष्ठावान कार्यकर्ता असून भाजप प्रवेशाच्या सर्व चर्चा पूर्णपणे निराधार आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

तटस्थ भूमिकेचे स्पष्टीकरण
राहुरीच्या रिंगणातून माघार घेतल्यापासून तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तसेच, त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न केल्यामुळे संभ्रम वाढला होता. यावर भाष्य करताना तनपुरे म्हणाले की, “ही पोटनिवडणूक राज्याच्या सत्तेचे समीकरण बदलणारी नसून केवळ स्थानिक प्रश्नांवर आधारित आहे. त्यामुळे मी माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नाही, याचा अर्थ चुकीचा काढला जाऊ नये.”

क्लीन चिट आणि निवडणुकीचा संबंध काय?
साखर कारखाना व्यवहारातील प्रकरणातून त्यांना मिळालेल्या दिलाशामुळेही चर्चांना उधाण आले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, आर्थिक गुन्हे शाखेने वर्षभरापूर्वीच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता आणि 3 महिन्यांपूर्वी न्यायालयाने तो स्वीकारला होता. काल आलेला निकाल आणि आजची निवडणूक हा केवळ एक योगायोग आहे. याचा माझ्या राजकीय निर्णयाशी कोणताही संबंध नाही.

दरम्यान,स्थानिक पातळीवर कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, याचे स्वातंत्र्य आपण कार्यकर्त्यांना दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. “कार्यकर्त्यांनी गावागावांतील प्रश्नांनुसार निर्णय घ्यावा असे मी सांगितले आहे. मी आजही आणि भविष्यातही आदरणीय शरद पवार साहेबांच्याच विचारांसोबत राहणार आहे,” असा विश्वास यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!