Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: अवघ्या 70 हजार रुपयांसाठी तरुणाचा गळा चिरला; झेड-ब्रिज जवळील हत्याकांडाचा उलगडा, दोन आरोपींना बेड्या

Pune Crime: अवघ्या 70 हजार रुपयांसाठी तरुणाचा गळा चिरला; झेड-ब्रिज जवळील हत्याकांडाचा उलगडा, दोन आरोपींना बेड्या

Pune Crime: डेक्कन येथील नदीपात्रात १९ एप्रिल रोजी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने पुणे शहर हादरले होते. गंज पेठ येथील रहिवासी कृषल कसबे (वय ४२) यांची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी ओंकार कांबळे (वय २७, रा. धनकवडी) या मुख्य संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पैशांच्या वादातून टोकाचे पाऊल
पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, हत्येचे मुख्य कारण आर्थिक व्यवहार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी ओंकार कांबळे याने मृत कृषल कसबे यांच्याकडून ७० हजार रुपये घेतले होते. या पैशांच्या परतफेडीवरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. घटनेच्या दिवशीही याच कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात ओंकारने शस्त्राने कृषल यांचा गळा चिरून त्यांना संपवले.

पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न
आरोपींनी पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी अतिशय चलाखीने प्रयत्न केले होते. गुन्हा केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून आरोपींनी स्वतःचे रक्ताळलेले कपडे बदलले होते.
गुन्हे शाखेला हडपसर परिसरात आरोपीची दुचाकी सापडली, ज्यावर रक्ताचे डाग होते. दुचाकीच्या डिकीमध्ये पोलिसांना तीन मोबाईल संचही आढळून आले आहेत.

डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई
मृतदेह आढळून आल्यानंतर डेक्कन पोलीस आणि गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने केली असून, आरोपींना आता न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!