Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BJP Candidates : भाजपकडून 30 नावं दिल्लीला, पण ‘ही’ अट ठरवणार उमेदवारीचं भविष्य; अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट?

BJP Candidates : भाजपकडून 30 नावं दिल्लीला, पण ‘ही’ अट ठरवणार उमेदवारीचं भविष्य; अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट?

BJP Candidates : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी रणनीती आखली असून मुंबईतील बैठकीनंतर तब्बल 30 संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आली आहे.

या यादीत माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे यांसारख्या नावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र, अंतिम निवड करताना पक्षाकडून एक महत्त्वाची अट लागू केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना विधानपरिषदेवर संधी न देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे अनेक प्रस्थापित आणि बड्या नेत्यांच्या आशांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

भाजपकडून आता संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना तसेच जातीय व प्रादेशिक समतोल साधणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची रणनीती आखली जात आहे. “जनतेतून निवडून न आलेल्यांना मागच्या दाराने संधी देणे योग्य नाही,” असे मत पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, विधानपरिषेद निवडणूक 2026 साठी 12 मे रोजी मतदान होणार असून एकूण 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. उर्वरित जागांसाठी मात्र चुरस वाढणार असून, अंतिम यादीत कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!