पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपुरातील एका शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आता अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर येथे प्रकल्प सहयोगी-I या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही २७ जानेवारी २०२६ रोजी CSIR-NEERI, नेहरू मार्ग, अजनी स्क्वेअर जवळ, नागपूर – 440020 येथे घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 31000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी-I.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 31,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : ३५ वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : २७ जानेवारी २०२६ (रिपोर्टिंगची वेळ: सकाळी ९:३० ते ११:०० वाजेपर्यंत).
– मुलाखतीचा पत्ता : CSIR-NEERI, नेहरू मार्ग, अजनी स्क्वेअर जवळ, नागपूर – 440020.
- या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.neeri.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


