Pune Crime : वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली. या प्रकरणी टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अजमल अब्दुल नदाफ (२०, रा. आशियाना बिल्डिंग, अंजनीनगर, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आर्यन काळे, यश बोरकर, शुभम पोगुल यांच्यासह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अब्दुल रहीम नदाफ (४५) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल नदाफ याची आरोपींशी भांडणे झाली होती. गुरुवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अजमल हा कात्रजमधील संतोषनगर भागातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी अजमला याला अडवले. त्याला शिवीगाळ करून तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक मुलाणी पुढील तपास करत आहेत.


