मुंबई : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंगळवारी (4 मार्च) अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. या प्रकरणामुळेच देशमुख यांची हत्या झाली होती.
आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. मुंडे यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो राज्यपाल महोदयांकडे पाठवला आहे. त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना मुक्त करण्यात आले आहे.


