Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तालुक्यातील ग्रामपंचायती कार्यकर्त्यांनी बिनविरोध कराव्यात: दत्तात्रय भरणे

तालुक्यातील ग्रामपंचायती कार्यकर्त्यांनी बिनविरोध कराव्यात: दत्तात्रय भरणे

इंदापूर : गावाच्या तसेच तालुक्याच्या विकासासाठी लवकरच घोषित होणाऱ्या ८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका कार्यकर्त्यांनी बिनविरोध कराव्यात, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात पुणे जिल्हा परिषद, इंदापूर पंचायत समिती, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, गटविकास अधिकारी सचिन खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, आगामी काळात इंदापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक लवकरच घोषित होतील, या निवडणुकीमध्ये मी सहभाग घेणार नाही, कारण सर्वच माझ्या जवळचे आहेत, सर्व माझे आहेत, माझ्या जीवाभावाच्या आहेत, आम्हा नेते मंडळीचे मिटले, आता तुमची मिटायला काही हरकत नाही. आमचं जुळले आता तुम्ही जुळवून घ्या, असं मिश्किलपणे बोलताच सभागृहात हशा पिकला.

दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी तडजोड करावी, या निवडणुकीमध्ये एखाद्याने माघार घेऊन दुसऱ्या व्यक्तीला सरपंच होण्याची संधी दिली असेल, तर त्या व्यक्तीचे स्थान आमच्यासमोर मोठे आहे. एखाद्या गावात तडजोड होत नसेल, तर त्या ठिकाणी आम्हाला बोलवा. आपण सर्वजण तडजोड करण्याचा प्रयत्न करू. हा संदेश नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आपल्या गावागावात देतील. ज्या ग्रामपंचायत बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतींना अधिकचा विकास निधी देण्याची जबाबदारी आमची राहील अशी ग्वाही भरणे यांनी यावेळी दिली.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, सत्तर वर्षातील इतिहासातील नेत्रदीपक विजय या निवडणुकीत मिळाला आहे. याची सर्व श्रेय तालुक्यातील सुजाण व समजूतदार मतदारांचे आहे. काही घटना घडल्यानंतर जबाबदारीने कसे वागावे याचे उत्तम उदाहरण संपूर्ण राज्याला दाखवून दिले. नवनिर्वाचित सदस्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा गटविकास अधिकारी यांनी आयोजित करावी, सदस्यांनी बैठकीसाठी, मासिक सभेसाठी, विशेष सभेसाठी उपस्थित राहावे, विनाकारण गैरहजर राहू नये. मीटिंग पूर्वी किंवा सभेच्या अगोदर एक तास पक्षीय बैठक घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आदींचा झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या पूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!