Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: पुण्यात गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ‘या’ माध्यमातूनच होणार; किती तासांत घरपोच होणार? वाचा सर्व डिटेल्स

Pune News: पुण्यात गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ‘या’ माध्यमातूनच होणार; किती तासांत घरपोच होणार? वाचा सर्व डिटेल्स

Jitendra Dudi On LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपी (OTP) प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त ओटीपी प्रणालीद्वारेच करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच गोदाम,गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना तेल कंपन्या व वितरकांना देण्यात आल्या.त्यानुसार सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपीच्या माध्यमातून 96 तासांच्या आत घरपोच करण्यात येईल,असा आशय दर्शविणारे फलक लावावेत,असे निर्देशही देण्यात आले.जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपीद्वारेच 96 तासांच्या आत घरपोच करण्यात येईल,तरी गॅस एजन्सीसमोर गर्दी करू नये,असा संदेश (SMS) पाठवावा,असेही आवाहन करण्यात आले.

“गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केला, तर..”
याशिवाय, ग्राहकांनी घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत घरपोच वितरण करणे बंधनकारक राहील,असेही निर्देश गॅस वितरकांना देण्यात आले आहेत.नियमानुसार सुरू असलेल्या गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल,असे निर्देश पोलिस प्रशासनालाही देण्यात आले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!