Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात रक्तरंजित थरार..! वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; सपासप वार करत तरुणाला संपवलं

पुण्यात रक्तरंजित थरार..! वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; सपासप वार करत तरुणाला संपवलं

Pune Crime : पणे शहरात कोयता गँग आणि सराईत गुन्हेगारांनी धुमाकूळ घातलाय. वाघोलीनंतर पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील एका १९ वर्षीय तरुणावर कोयता हल्ला झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भरवस्तीत हत्येची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील आनंद नगर चौक परिसरात 19 वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे. पूर्व वैमानस्यातून ही हत्या झाली असून चार ते पाच जणांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला. मृत तरुण धायरी भागातील रहिवासी असून करण काशीद नाव असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. पूर्वी तो माणिक बागेतील अमृता नगर परिसरात राहत होता गेल्या दोन-तीन महिन्यापासून धायरीत वास्तव्यास आहे. अधिक तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

करण गिरीश काशीद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण हा सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथील संतोष हॉल परिसरात थांबला होता. यावेळी दोन ते तीन हल्लेखोर त्या ठिकाणी आले. काही समजण्याच्या आतच त्यांनी लोखंडी हत्याराने करणवर हल्ला केला. ​हल्लेखोरांनी करणच्या शरीरावर सपासप वार केले.

भरवस्तीत ही घटना घडल्याने परिसरात एकच पळापळ झाली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. ​प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत करण काशीद आणि आरोपींमध्ये पूर्वीचा वाद होता. याच वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

हत्येची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!