Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Accident News : देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात! एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Accident News : देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात! एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Accident News : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेश मधील आग्रा जवळ घडली. चित्राहाट परिसरात गुरुवारी रात्री भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट झाडाला जाऊन धडकली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही सर्व मंडळी करौली येथील कैला देवीचे दर्शन घेऊन दोन गाड्यांमधून परतत होती. रात्री उशिरा आग्रा-इटावा मार्गावर अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मागून येणाऱ्या दुसऱ्या गाडीतील नातेवाईकांनी तात्काळ मदत करत पोलिसांना कळवले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या दुर्घटनेत माजी लष्करी जवान कामता प्रसाद, त्यांचा मुलगा, सून सीमा, तीन वर्षांची नात आराध्या आणि चालक ऋषी यांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर सध्या सैफई वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर मोठा आवाज आणि मदतीसाठीच्या आक्रोशाने परिसर हादरला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाडीची काच फोडून जखमींना बाहेर काढले.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून एका कुटुंबावर ओढवलेल्या या दु:खद प्रसंगाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!