Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Fake Currency Racket: अजून एका बाबाचं काळं कृत्य उघड! आश्रमातच चालत होता नकली नोटांचा कारखाना अन्…

Fake Currency Racket: अजून एका बाबाचं काळं कृत्य उघड! आश्रमातच चालत होता नकली नोटांचा कारखाना अन्…

Fake Currency Racket: महाराष्ट्रात नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडालेली असतानाच आता शेजारील गुजरात राज्यातून एका भोंदू बाबाचे धक्कादायक कारस्थान उघडकीस आले आहे. अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या एका आश्रमात चक्क बनावट नोटा छापण्याचा कारखानाच सुरू असल्याचे समोर आले असून, अहमदाबाद गुन्हे शाखेने या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सुरतजवळील कामरेज तालुक्यातील पारडी गावात असलेल्या ‘श्री सत्य योग फाउंडेशन’ या आश्रमावर पोलिसांनी छापा टाकला असता, तिथे धर्माच्या नावाखाली देशविरोधी गोरखधंदा सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल २ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बनावट नोटांची एक मोठी खेप सुरतहून अहमदाबादला नेली जाणार होती. या माहितीच्या आधारे अमराईवाडी परिसरात नाकाबंदी करून पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या ६ पुरुष आणि काही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ५०० रुपयांच्या ४० हजारांहून अधिक बनावट नोटा सापडल्या, ज्यांची बाजारमूल्य कोट्यवधींच्या घरात आहे. या नोटा मोजताना खुद्द पोलीसही चक्रावून गेले होते.

तपासात या टोळीची कार्यपद्धती पाहून पोलीसही थक्क झाले. हे भामटे ‘५०० च्या खऱ्या नोटा द्या आणि त्या बदल्यात तीनपट बनावट नोटा मिळवा’ अशी योजना चालवत होते. ६६ लाख रुपयांच्या खऱ्या चलनाऐवजी २ कोटी रुपयांचे बनावट चलन चलनात आणण्याचा त्यांचा डाव होता. आश्रमात टाकलेल्या छाप्यात नोटा छापण्याचे प्रिंटिंग मशीन, संगणक, विशेष कागद, शाई आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. आश्रमाच्या गाड्यांचा वापर या नोटांच्या तस्करीसाठी केला जात होता. या प्रकरणाचे धागेदोरे देशभरात पसरले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!