नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi भारतात Redmi 15A 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. कंपनीने त्याच्या लाँचची तारीख निश्चित केली असून, हा बजेट 5G फोन २७ मार्च रोजी भारतात लाँच होईल असे म्हटले आहे. यामध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Xiaomi ने एक टीझर प्रसिद्ध केला आहे आणि The Rear Hero या टॅगलाइनसह त्याची ओळख करून दिली आहे. याचा डिस्प्ले, प्रोसेसर, कॅमेरा याला त्याच्या सेगमेंटमधील सर्वोत्तम हँडसेट बनवेल, असा विश्वास आहे. कंपनीने यामध्ये ६३००mAh बॅटरी दिली आहे. जे लोक आपला स्मार्टफोन दैनंदिन कामे, गेमिंग आणि चित्रपट पाहण्यासाठी वापरतात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. Redmi 15A 5G मध्ये १२०Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. हा फोन त्याच्या सेगमेंटमधील सर्वात मोठ्या डिस्प्लेसह आणि स्मूथ परफॉर्मन्ससह मिळणार आहे.
REDMI 15A 5G मध्ये आकर्षक डिझाइन आणि अनेक उत्तम फीचर्स असणार आहेत. REDMI 15A 5G च्या मागील पॅनलवर एक आकर्षक, आधुनिक कॅमेरा मॉड्यूल आहे. यात AI कॅमेरा सेटअप आहे. हा हँडसेट तीन आकर्षक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. ब्लॅक, ब्ल्यू आणि लॅव्हेंडर या कलरमध्ये असणार आहे.
REDMI 15A 5G होणार लाँच
REDMI 15A 5G च्या अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, हा हँडसेट इतर ब्रँड्सपेक्षा स्वस्त असण्याची शक्यता आहे. याची किंमत सुमारे 10000 असण्याची शक्यता आहे.


