Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सोन्याच्या दरात मोठी घसरण! सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण

सोन्याच्या दरात मोठी घसरण! सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण

Gold Silver Rate : अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढताच सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सराफा बाजारात सोन्याचा दर 5346 रुपये प्रति तोळा कमी झाले. एका तोळ्याचा दर 145504 रुपयांवर पोहोचला. तर, चांदीच्या दरात देखील 15176 रुपयांची घसरण झाली. चांदीचा एक किलोचा दर 224660 रुपयांवर आला आहे.

आयबीजेएनुसार सोन्याचा सराफा बाजारातील दर 176121 रुपयांच्या तुलनेत 30614 रुपयांनी कमी झाला आहे. दुसरीकडे आयबीजेएच्या दरांनुसार चांदीचा दर उच्चांकाच्या तुलनेत 161273 रुपयांनी घसरला आहे.

आयबीजेएच्या माहितीनुसार 2 एप्रिलला 23 कॅरेट सोन्याचा दर 144924 रुपये प्रति तोळा इतके आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 133284 रुपये इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 109130 रुपये तोळा इतका आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 85122 रुपये 10 ग्रॅम इतका आहे.

अमेरिका आणि इराण युद्ध सुरु झाल्यापासून सोनं 13590 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीचा दर 43240 रुपयांनी कमी झाला आहे. 27 फेब्रुवारीला सोन्याचा दर 159097 रुपये होता. तर, चांदीचा दर 267900 रुपये किलो होता.

सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचं कारण इराण युद्धावरील डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण, युद्धामुळं वाढत असलेला तणाव आणि तेलाचे वाढते दर आणि डॉलर मजबूत होणं ही आहेत. काही तज्ज्ञांच्या मते सोन्याचे एका तोळ्याचे दर 115000 रुपयांपर्यंत तर चांदीचे दर 175000 रुपये किलोपर्यंत खाली येऊ शकतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!