Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकचा वार्षिक पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकचा वार्षिक पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

Indapur News: इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक महाविद्यालयात ISTE स्टुडंट चॅप्टर (MH-323) च्या वतीने 4 एप्रिल 2026 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष कामगिरीचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. कोंढाळकर सर आणि गुगल इंडियाचे टेक्निकल लीड राहुल मखरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.

क्रीडा आणि सांस्कृतिक यशाचा गौरव
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. सोमनाथ चिकणे यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी सांभाळले. या सोहळ्यात क्रीडा स्पर्धांमध्ये झोनल स्तरावर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या गौरव सोहळ्याचे समन्वयन प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ व प्रा. डॉ. संजय कदम यांनी चोखपणे पार पाडले.

उत्कृष्ट विद्यार्थी आणि विभागांची घोषणा
या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये ‘डिपार्टमेंट लेव्हल बेस्ट आऊटगोइंग स्टुडंट ऑफ द इयर’ या किताबासाठी प्रत्येक विभागातून गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. संपूर्ण संस्थेमधून ‘इन्स्टिट्यूट लेव्हल बेस्ट आऊटगोइंग स्टुडंट’ म्हणून कु. प्राची भाऊ भांडारे हिची निवड करून तिचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच, उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा ‘बेस्ट परफॉर्मिंग डिपार्टमेंट ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाला बहाल करण्यात आला.

उज्ज्वल भविष्यासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत, शिस्त आणि सातत्य या यशाच्या त्रिसूत्रीवर भर दिला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारोप प्रसंगी मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!