Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chhagan Bhujbal Helicopter Landing: पुरंदरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅड सोडून थेट कार पार्किंगमध्ये उतरलं

Chhagan Bhujbal Helicopter Landing: पुरंदरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅड सोडून थेट कार पार्किंगमध्ये उतरलं

Chhagan Bhujbal Helicopter Landing: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवाडी येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आले होते. मात्र, त्यांच्या आगमनादरम्यान वैमानिकाच्या एका चुकीमुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रशासनाने हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी एका निश्चित ठिकाणी खास हेलिपॅड तयार केले होते. असे असूनही, कार पार्किंगच्या जागेत एक मोकळी जागा पाहून वैमानिकाने तीच नियोजित हेलिपॅडची जागा असल्याचे समजले आणि तिथेच हेलिकॉप्टर उतरवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यात हेलिकॉप्टर पार्किंगच्या अरुंद जागेत उतरताना दिसत आहे.

प्रशासकीय धावपळ आणि व्हिडिओ समोर
कार पार्किंगच्या ठिकाणी अनपेक्षितपणे हेलिकॉप्टर उतरल्याने उपस्थित पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ झाली. पोलिसांनी तातडीने वैमानिकाला त्याची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर, छगन भुजबळ हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर ते हेलिकॉप्टर पुन्हा उड्डाण करून नियोजित हेलिपॅडवर नेण्यात आले. सुदैवाने, कार पार्किंगची जागा मोकळी असल्याने कोणताही मोठा अपघात घडला नाही. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर पार्किंगच्या जागेवरून पुन्हा उड्डाण करताना स्पष्टपणे दिसत आहे.

छगन भुजबळ: महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व
छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आणि ओबीसी (OBC) समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी आहे. नाशिकच्या येवला मतदारसंघातून 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि 1999 मध्ये शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. त्यांनी महाराष्ट्राचे 2 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले असून, सार्वजनिक बांधकाम आणि गृह विभागासारखी महत्त्वाची खातीही सांभाळली आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!