Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता; जागतिक तेलदर आणि युद्धस्थितीचा परिणाम

निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता; जागतिक तेलदर आणि युद्धस्थितीचा परिणाम

Petrol Diesel Price hike : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील उसळीचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुका 2026 संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ रोखून ठेवण्यात आली होती. मात्र तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेल कंपन्या दरवाढीचा निर्णय घेऊ शकतात.

इंडियन ऑइल , भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिल 2022 पासून इंधन दर स्थिर ठेवले आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर सुमारे 18 रुपये आणि डिझेलवर 35 रुपये तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे.

जागतिक स्तरावर रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठे चढ-उतार झाले. काही काळ दर 120 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत गेले, तर काहीवेळा 70 डॉलर्सपर्यंत घसरले. तरीही भारतात इंधन दर स्थिर ठेवण्यात आले होते.

दरम्यान, सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून कंपन्यांचा ताण काही प्रमाणात कमी केला असला तरी हा तोटा दीर्घकाळ सहन करणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ जवळपास निश्चित मानली जात आहे.

सध्याचे इंधन दर (प्रति लिटर):

पेट्रोल:
दिल्ली – 94.77 रु.
मुंबई – 103.50 रु.
कोलकाता – 105.41 रु.
चेन्नई – 101.06 रु.
हैदराबाद – 107.46 रु.
बंगळुरू – 102.92 रु.

डिझेल:
दिल्ली – 87.67 रु.
मुंबई – 90.03 रु.
कोलकाता – 92.02 रु.
चेन्नई – 92.61 रु.
हैदराबाद – 95.70 रु.
बंगळुरू – 90.99 रु.

इंधन दर वाढल्यास वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सरकार आणि तेल कंपन्या कोणता निर्णय घेतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!