IPL Point Table 2026 : सीएसकेने केकेआर विरुद्ध ३२ धावांनी शानदार विजय मिळवत आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयामुळे चेन्नईने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेत इतर चार संघांसोबत गुणांची बरोबरी साधली आहे.
या सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये राजस्थान संघ ८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर पंजाबचा संघ ७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबी ६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या ते आठव्या स्थानापर्यंत सर्व संघांचे ४-४ गुण असून सीएसकेही आता या गटात सामील झाली आहे.
या विजयाचा फटका मुंबई इंडियन्स संघाला बसला असून संघ नवव्या स्थानावर घसरला आहे. मुंबईचा सलग तिसरा पराभव झाल्याने प्लेऑफच्या शर्यतीत त्यांची स्थिती कठीण होत चालली आहे.
एम. ए. चिदंबरम स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १९२ धावा केल्या. त्यानंतर सीएसकेच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत केकेआरला १६० धावांवर रोखले.
कोलकाताच्या डावात सुनील नारायण, अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी यांना चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी खेळी करण्यात ते अपयशी ठरले. नूर अहमदने प्रभावी गोलंदाजी करत महत्त्वाचे विकेट्स घेतले.
दरम्यान, मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पुढील सामना जिंकणे अत्यावश्यक ठरणार आहे. अन्यथा प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे कठीण होऊ शकते.


