आपण निरोगी राहावं असं अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. वाढत्या वयानुसार नियमित तपासण्याही महत्त्वाच्या असतात. त्यात वृद्धापकाळात शारीरिक उपचार आणि नियमित व्यायाम हे ज्येष्ठांचे आरोग्य, स्वावलंबन आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे उपचार संधिवात, हाडांची झीज, आणि स्नायूंच्या कमकुवतपणासारख्या वयानुसार येणाऱ्या समस्यांवर मात करण्यास मदत करतात.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. हे उपचारांद्वारे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये शरीराच्या सर्व भागांना मिळतात. मानसिक आरोग्य सुधारणे गरजेचे असते. शारीरिक हालचालींमुळे एंडोर्फिन संप्रेरक बाहेर पडते, ज्यामुळे मूड सुधारतो आणि नैराश्य किंवा चिंता कमी होण्यास मदत होते. वृद्धांमध्ये पडण्याचे आणि फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण जास्त असते. शारीरिक उपचार संतुलन आणि समन्वय सुधारून पडण्याचा धोका कमी करतात. पायांची ताकद आणि स्थिरता वाढवून सुरक्षितता सुनिश्चित केली जाते.
स्नायू आणि हाडे मजबूत करणे तितकेच आवश्यक असते. असे केल्यास प्रशिक्षण आणि वजन उचलण्याचे व्यायाम हाडांची घनता कमी होण्यापासून रोखले जाते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही कमी होतो. फिजिओथेरपीमुळे संधिवात आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. जॉइंट मोबिलायझेशन आणि मऊ स्नायू व्यायामामुळे सांध्यांची कडकपणा कमी होऊन हालचाल सोपी होते.


