Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Marathi Language Compulsory: ‘मराठीची मुस्कटदाबी सहन करणार नाही…’; संपाची भाषा करणाऱ्या रिक्षाचालकांना प्रताप सरनाईकांचा इशारा

Marathi Language Compulsory: ‘मराठीची मुस्कटदाबी सहन करणार नाही…’; संपाची भाषा करणाऱ्या रिक्षाचालकांना प्रताप सरनाईकांचा इशारा

Marathi Language Compulsory: महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवायची असेल, तर मराठी भाषा येणे आता केवळ इच्छा नसून कायदेशीर सक्ती असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करत काही अमराठी संघटनांनी ४ मे पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या भूमिकेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कमालीचे संतापले असून, “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठी बोलावेच लागेल,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना ठणकावले आहे.

कायदेशीर सक्ती का? मंत्र्यांनी मांडली भूमिका
प्रताप सरनाईक यांच्या मते, हा निर्णय केवळ भाषेचा अभिमान नसून तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. प्रवाशांशी होणारे वाद, अरेरावी आणि वाढते गुन्हे रोखण्यासाठी चालकांना स्थानिक भाषा येणे अनिवार्य आहे. “चर्चा न करता थेट संपाची भाषा करणे ही मराठी भाषेची मुस्कटदाबी आहे. परिवहन मंत्री म्हणून मी हे खपवून घेणार नाही,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

साहित्यिकांच्या साथीने ‘मराठीचा’ मास्टर प्लॅन
केवळ सक्ती करून न थांबता, अमराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी राज्य सरकार विशेष पाऊल उचलत आहे. उद्या, २३ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता परिवहन मंत्र्यांनी ज्येष्ठ साहित्यिक आणि तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. यामध्ये उज्ज्वला मेहेंदळे, अशोक बागवे, अरुण म्हात्रे यांसारखे दिग्गज साहित्यिक चालकांसाठी सोपा मराठी अभ्यासक्रम तयार करण्यावर मार्गदर्शन करतील. १ मे (महाराष्ट्र दिन) पासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू होईल. ज्यांना मराठी येत नाही, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची सोय केली जाईल, मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची टांगती तलवार कायम असेल.

‘अभिजात’ भाषेचा सन्मान राखणार
मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात’ दर्जा मिळाल्याने, टॅक्सी आणि रिक्षांसारख्या सार्वजनिक सेवांमध्ये तिचा वापर होणे हा भाषिक अस्मितेचा भाग असल्याचे सरकारने म्हटले आहे. ओला, उबर आणि ई-बाईक टॅक्सी चालकांनाही हा नियम लागू होणार आहे. २०१९ च्या जुन्या नियमाची आता नव्या दमाने आणि कडक शिस्तीने अंमलबजावणी करण्याचा निर्धार परिवहन विभागाने व्यक्त केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!