Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात खळबळ! हात बांधलेल्या अवस्थेत झाडाला लटकलेला जवानाचा मृतदेह; आत्महत्या की हत्या?

पुण्यात खळबळ! हात बांधलेल्या अवस्थेत झाडाला लटकलेला जवानाचा मृतदेह; आत्महत्या की हत्या?

पुणे : शहरात लष्कराच्या जवानाच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय लष्करातील सुभेदार सिद्धेश भोसले यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्यांचे हातही बांधलेले असल्याने या प्रकरणाने गूढ निर्माण झाले आहे.

ही घटना पुणे-आळंदी रस्त्यावरील म्हस्के वस्ती, कुसमाडे कॉलनी परिसरात उघडकीस आली. घराबाहेरील झाडाला भोसले यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला. त्यांच्या गळ्याभोवती पाण्याचा पाईप होता आणि त्याच पाईपने हातही बांधलेले होते. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चिलुमुला रजनीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून भोसले रात्री घराबाहेर कसे गेले आणि त्यांच्या सोबत काय घडले, याचा शोध घेतला जात आहे.

सुभेदार भोसले हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टिक्स खेळाडू होते. त्यांनी २०१७ मध्ये कझाकस्तान येथे झालेल्या आशियाई ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्य पदक जिंकले होते. सध्या ते ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग’ (CME) येथे कार्यरत होते आणि ‘बॉम्बे सॅपर्स’च्या इंजिनिअर रेजिमेंटशी संबंधित होते.

शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूचे कारण गळफास असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी “हात बांधलेल्या अवस्थेत गळफास घेणे शक्य आहे का?” हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. त्यामुळे आर्थिक, वैयक्तिक किंवा व्यावसायिक तणावाचा कोन तपासला जात असून सर्व शक्यता तपासात आहेत. या घटनेमुळे पुण्यासह लष्करात शोककळा पसरली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!