Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kalpna Kharat : भोंदूगिरीचा मास्टरमाईंड तुरुंगात, पत्नी फरार; तरीही रायगडमध्ये केलं ‘हे’ मोठं कांड

Kalpna Kharat : भोंदूगिरीचा मास्टरमाईंड तुरुंगात, पत्नी फरार; तरीही रायगडमध्ये केलं ‘हे’ मोठं कांड

Kalpna Kharat : भोंदूगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात तुरुंगात असताना आणि त्याची पत्नी कल्पना खरात पोलिसांना गुंगारा देऊन फरार असतानाच, उरणमध्ये या दाम्पत्याने लाखोंचा जमीन व्यवहार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या व्यवहारात महसूल विभागाने दाखवलेल्या ‘सुसाट’ वेगानं आता अनेक संशयास्पद प्रश्न निर्माण केले आहेत.

नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील चाणजे गावातील सुमारे २० गुंठे जमीन (किंमत ५८ लाख ५० हजार रुपये) कल्पना अशोक खरात हिच्या नावावर खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे, १२ मार्च २०२६ रोजी या जमिनीचे खरेदीखत नोंदवले गेले आणि १७ मार्चला जेव्हा पोलिसांनी पती अशोक खरातला अटक केली, त्याच दिवशी या व्यवहाराची ‘वर्दी नोटीस’ तातडीने चावडीवर लावण्यात आली.

महसूल यंत्रणेची ‘अति’ तत्परता चर्चेत
सामान्य नागरिकांना सातबाऱ्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, फरार आरोपीच्या पत्नीच्या बाबतीत यंत्रणा कमालीची सक्रिय दिसली. खरेदीखत नोंदवल्यापासून अवघ्या एका महिन्यात (१३ एप्रिल) फेरफार क्रमांक ८३५१ मंजूरही करण्यात आला. खरेदीदार महिला फरार असताना तिची ओळख कशी पटवली गेली?दस्तऐवजावर सह्या करण्यासाठी ती हजर होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रशासनाचा आता ‘यू-टर्न’
या व्यवहारामुळे वाद निर्माण होताच नायब तहसीलदार पेडवी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. “सदर फेरफार नोंदीसाठी कोणीही पुढे न आल्याने ती रद्द करण्यात आली आहे,” असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, मूळ खरेदीखत अजूनही कायम असल्याने भविष्यात ही जमीन पुन्हा ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!