Maharashtra Politics : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच एका नव्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री भेट घेतल्याचा दावा ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने केला आहे.
या कथित भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीमागील कारणांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मात्र या दाव्याबाबत अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, या संदर्भात संजय राऊत यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही अशा कोणत्याही भेटीची माहिती नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
एकूणच, या कथित भेटीच्या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


