नागपूर: नागपूर दंगल प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या फहीम शमीम खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता फहीम खानला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
नागपूर शहरातील गणेश पेठ पोलीस स्टेशन ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या एफआयआरमधून दंगलीमागील सुत्रधाराचे नाव समोर आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फहीम खान हा राजकीय नेता असून तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष आहे. हिंसाचार उफाळून येण्यास फहीम हा जबाबदार आहे. त्यानेच लोकांची माथी भडकवली आणि गर्दी जमवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


