Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Solapur Crime News : झोपेत लागलेल्या पायावरून वाद अन् हत्या; सोलापुरात तरुणाचा दगडाने ठेचून खून

Solapur Crime News : झोपेत लागलेल्या पायावरून वाद अन् हत्या; सोलापुरात तरुणाचा दगडाने ठेचून खून

Solapur Crime News : सोलापूरच्या मीनाक्षी नगर परिसरात किरकोळ कारणावरून घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. झोपेत पाय लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे या मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली.

घटनेच्या दिवशी महेश तेलगू शाळेजवळील मोकळ्या जागेत झोपला होता. त्यावेळी आरोपी नागनाथ उर्फ सोमनाथ जवळकोठे याचा पाय महेशला लागला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि शिवीगाळीचे रूपांतर मारहाणीत झाले.

रागाच्या भरात आरोपीने जवळच असलेला दगड उचलून महेशच्या डोक्यात मारला. गंभीर जखमी झालेल्या महेशचा जागीच मृत्यू झाला. दोघेही दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!