HSC Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी (HSC) परीक्षेचा निकाल २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, विद्यार्थी Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education च्या mahahsscboard.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकणार आहेत.
निकाल जाहीर होण्यापूर्वी त्याच दिवशी सकाळी ११ वाजता मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत निकालासंबंधी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान झालेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याने, अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी याबाबत माहिती देत माध्यम प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.


