Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pankaja Munde : ‘मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले’; परळीतील कार्यक्रमात पंकजा मुंडेंची दिलखुलास कबुली

Pankaja Munde : ‘मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले’; परळीतील कार्यक्रमात पंकजा मुंडेंची दिलखुलास कबुली

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी परळीतील एका कार्यक्रमात आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य करत उपस्थितांची मने जिंकली. “मला डॉक्टर व्हायचं होतं, पण कमी मार्क मिळाल्याने प्रवेश घेतला नाही,” अशी कबुली त्यांनी दिली.

परळी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुंडे कुटुंबातील सदस्यांच्या करिअरविषयी मिश्किल शैलीत भाष्य केले. “आमच्या प्रीतम ताईंना वकील व्हायचं होतं, पण त्या डॉक्टर झाल्या. येसू ताई वकील झाल्या. धनु भाऊ मात्र भाग्यवान ठरले, त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. यावेळी व्यासपीठावर धनंजय मुंडे उपस्थित होते.

याचवेळी त्यांनी आपल्या व्यवसायाबाबतही मिश्किल टिप्पणी केली. “माझा आणि माझ्या व्यवसायाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. मी मोठी डिस्टिलरी चालवते, पण तिथला ब्रँडही मला माहित नाही,” असे म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनीही भाषणात खास शैलीत फटकेबाजी केली. मराठवाड्यातील पाहुणचाराचे वर्णन करताना त्यांनी, “आमचा पाहुणचार एवढा असतो की तुम्ही आमच्या प्रेमात पडाल,” असे म्हणत उपस्थितांचे मनोरंजन केले.

या कार्यक्रमात मुंडे बहीण-भावांमधील हलक्याफुलक्या संवादांनी राजकीय वातावरणातही वेगळा रंग भरल्याचे पाहायला मिळाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!