Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati Bypoll Election Result: बारामतीत सुनेत्रा पवारांचा ‘रेकॉर्डब्रेक’ विजय; दादांचा विक्रम मोडीत काढत रचला इतिहास

Baramati Bypoll Election Result: बारामतीत सुनेत्रा पवारांचा ‘रेकॉर्डब्रेक’ विजय; दादांचा विक्रम मोडीत काढत रचला इतिहास

Baramati Bypoll Election Result: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर भारतीय राजकारणातील एक नवा इतिहास रचला आहे. तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांचे प्रचंड मताधिक्य घेत त्यांनी विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे. हे मताधिक्य देशातील विधानसभा निवडणुकांच्या इतिहासातील पहिल्या क्रमांकाचे ‘लीड’ मानले जात आहे.

अजित पवारांचा ‘तो’ ऐतिहासिक विक्रम आता इतिहासजमा
आजवर बारामतीत आणि महाराष्ट्रात सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. २०१९ मध्ये त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा १ लाख ६५ हजार २६५ मतांनी पराभव केला होता. मात्र, सुनेत्रा पवारांनी १९ व्या फेरीअखेरच हा विक्रम मोडीत काढला आणि २.१८ लाखांच्या फरकाने विजयाची नवी मोहोर उमटवली.

अजित पवारांचे यापूर्वीचे मोठे विजय:

  • २०१९: १,६५,२६५ मताधिक्य (विक्रमी)
  • २०२४: १,००,८९९ मताधिक्य (युगेंद्र पवारांविरुद्ध)
  • २००९: १,०२,७९७ मताधिक्य

अटीतटीची लढत की एकतर्फी विजय?
सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे, शरद पवार गटाने येथे उमेदवार न देता सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला होता. काँग्रेसने उमेदवार उभा केला होता, मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने लढत एकतर्फी झाली. आमदार रोहित पवार यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती, ज्याचा फायदा सुनेत्रा पवारांना विक्रमी मते मिळवण्यात झाला.

बारामतीकरांचे ‘वहिनीं’वर भरभरून प्रेम
अजित पवार सलग आठ वेळा बारामतीतून निवडून आले आहेत, पण सुनेत्रा पवारांना मिळालेले हे मताधिक्य बारामतीकरांनी त्यांच्यावर केलेल्या विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे. या विजयाने बारामती हा पवारांचा अभेद्य गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, सुनेत्रा पवारांनी पहिल्याच प्रयत्नात ‘जायंट किलर’ ठरत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!