Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हाऊसफुल्ल गर्दीत रंगले ‘अबब विठोबा बोलू लागला’; इंदापूरकर मंत्रमुग्ध!

हाऊसफुल्ल गर्दीत रंगले ‘अबब विठोबा बोलू लागला’; इंदापूरकर मंत्रमुग्ध!

Abbab Vithoba Bolu Lagla: इंदापूरच्या सांस्कृतिक विश्वात रविवारी एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळाला. येथील डॉ. कदम गुरुकुल ऑडिटोरियम येथे ‘अबब विठोबा बोलू लागला’ या बहुचर्चित महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला. या प्रयोगाला इंदापूरकर रसिकांनी अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण नाट्यगृह ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. उपस्थित सर्वच रसिक प्रेक्षक या महानाट्याचा दर्जेदार थरार अनुभवताना पूर्णपणे मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रभाकर मोरे यांच्या अभिनयाची जादू आणि उत्कृष्ट दिग्दर्शन
या महानाट्याचे मुख्य आकर्षण ‘हास्य जत्रा’ फेम प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे हे होते. त्यांच्या अफलातून अभिनयाने, अचूक टायमिंगने आणि प्रभावी संवादफेकीने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवले. नाटकातील दर्जेदार विनोद, त्याला जोडलेला संवेदनशील सामाजिक संदेश आणि सर्वच कलाकारांचे जिवंत सादरीकरण यामुळे संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने आणि हास्याच्या कारंज्यांनी दुमदुमून गेले होते. दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांच्या उत्कृष्ट आणि सुबक दिग्दर्शनासोबतच निर्माती नमिता वागळे गिरकर यांच्या चोख नियोजनामुळे हा प्रयोग अत्यंत भव्य आणि यशस्वी ठरला, ज्याने इंदापूरच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली.

प्रायोजक आणि मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती
हा भव्य सांस्कृतिक सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक नामांकित संस्थांचे विशेष सहकार्य लाभले. यामध्ये मुख्य प्रायोजक म्हणून ‘चंदुकाका सराफ’, तर सहप्रायोजक म्हणून ‘सागर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल’ आणि ‘ओंकार मोबाईल’ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या ऐतिहासिक प्रयोगाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये चंदुकाका सराफचे महादेव केसकर (BM), पूर्व मेहता (ABM), राहुल घोरपडे (क्लस्टर मॅनेजर), प्रदीप शिंदे, संकेत केरीमाने, दयानंद गायकवाड, सचिन कांबळे, अजय सोनवणे, सूरज भोसले आणि चंद्रकांत खाडे यांचा समावेश होता. तसेच सागर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉलचे पदाधिकारी, ओंकार मोबाईलचे गणेश रोडे, स्नेहा गणेश रोडे, ओंकार रोडे आणि इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप पाटील आदी मान्यवर या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. इंदापूरकरांसाठी हा नाट्यप्रयोग एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!