Today शुक्रवार, 6th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sangli Crime: सांगलीत भोंदूगिरीचा पर्दाफाश! अंगात देव येत असल्याचा बनाव करत नरबळीचा सल्ला; गुन्हा दाखल

Sangli Crime: सांगलीत भोंदूगिरीचा पर्दाफाश! अंगात देव येत असल्याचा बनाव करत नरबळीचा सल्ला; गुन्हा दाखल

Sangli Crime: माझ्या अंगात देव येतो… छत्रपती शिवाजी महाराज येतात…” असा खोटा बनाव रचून एका कुटुंबाला नरबळीची भीती दाखवत त्यांची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील विटा परिसरात उघडकीस आला आहे. जादूटोणा आणि अघोरी प्रथांचा वापर करून वर्षानुवर्षे छळ करणाऱ्या भोंदूबाबांच्या टोळीविरुद्ध अखेर ‘महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्या’न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंनिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश
या गंभीर प्रकरणाला न्याय मिळवून देण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस) आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे यांचे विशेष योगदान लाभले आहे. पीडित कुटुंबाने यापूर्वी विटा पोलीस ठाण्यात दाद मागण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याची पुरेशी दखल घेतली गेली नव्हती. अखेर हे प्रकरण अंनिसकडे गेल्यानंतर विवेक भिंगारदेवे आणि समितीने सातत्याने पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक पुरावे गोळा केले. त्यांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे पोलिसांनी आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू केली.

संकट टाळण्यासाठी ‘नरबळी’ची भीती आणि पैशांची लूट
तक्रारदार कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी भोंदू महाराज संकेत निकम, महेश बाबर आणि सूरज उपाध्याय यांनी स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवत कुटुंबाला सतत दहशतीखाली ठेवले होते. “तुमच्या घरावर वाईट शक्तींचा प्रभाव आहे, तुमचा पती किंवा मुलगी मरेल; हे संकट टाळायचे असेल तर नरबळी द्यावा लागेल,” अशी भयावह भीती दाखवून या भोंदू टोळीने कुटुंबाकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले. अंगात देव आल्याचे नाटक करून आरोपी पती-पत्नीला बुक्क्यांनी मारहाण करत मानसिक दबाव देखील टाकत असत.

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा संशय; विटा परिसरात खळबळ
या प्रकरणात आणखी एक अत्यंत गंभीर व संतापजनक वळण समोर आले आहे. या भोंदूगिरीच्या जाळ्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे. पीडित मुलगी यापूर्वी विटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती, परंतु तिथेच तिला अचानक चक्कर आल्यामुळे त्यावेळी गुन्हा नोंदवता आला नव्हता. या अत्याचार प्रकरणी आता लवकरच स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण अघोरी प्रकारामुळे विटा आणि सांगली जिल्ह्यात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!