Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jalna Fuel Shortage: बाटली आणि कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर निर्बंध; इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर जालन्यात नवे नियम लागू

Jalna Fuel Shortage: बाटली आणि कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर निर्बंध; इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर जालन्यात नवे नियम लागू

Jalna Fuel Shortage: राज्यात काही भागांत पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होत आहे. या परिस्थितीचा विचार करून जालना जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी अशीमा मित्रा यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना त्यांच्या उपलब्ध इंधनसाठ्यातील 5 टक्के हिस्सा अत्यावश्यक सेवा आणि शासकीय वाहनांसाठी राखून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने कॅन, प्लास्टिक डबे किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल देण्यास मनाई करण्यात आली आहे. वाढती गर्दी आणि संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी रांग

दरम्यान, जालना जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी रांग दिसून येत असून विशेषतः डिझेलसाठी वाहनचालक आणि शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातही डिझेलची कमतरता सलग चौथ्या दिवशी कायम असल्याचे चित्र आहे. अनेक पंपांवर डिझेल संपल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. शेतकरी आणि मालवाहतूक चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्यरात्रीपर्यंत अनेक ठिकाणी डिझेलसाठी प्रतीक्षा सुरू असल्याचे दिसून आले.

बीड जिल्ह्यातही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी

बीड जिल्ह्यातही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी वाढली आहे. खरीप हंगामाची कामे सुरू असल्याने ट्रॅक्टरसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी नागरिक कॅनमधून डिझेल नेत असल्याचे चित्र दिसत असले, तरी इंधनाचा तुटवडा नसल्याचा दावा पेट्रोल पंप चालकांकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात पुरवठा आणि उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!