Today सोमवार, 3rd ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Mumbai Expressway Accident: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण दुर्घटना; स्कोडा कारची रेलिंगला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू

Pune Mumbai Expressway Accident: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण दुर्घटना; स्कोडा कारची रेलिंगला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू

Pune Mumbai Expressway Accident: पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर मावळ तालुक्यातील बऊर गावाजवळ बुधवारी सकाळी एक गंभीर अपघात घडला. मुंबईहून पुण्याकडे येणारी स्कोडा कार भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि कार थेट महामार्गावरील लोखंडी सुरक्षा कठड्यावर आदळली.

तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू

अपघाताचा जोर इतका प्रचंड होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. वाहनातील तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. धडकेनंतर कारमधील प्रवासी आतमध्ये अडकून पडले होते. बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर वाहनाचा पत्रा कापून सर्वांना बाहेर काढले. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि आयआरबीची टीम घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!