Today शुक्रवार, 6th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Nashik High Speed Railway: जपानच्या साथीने ‘पुणे-नाशिक’ हायस्पीड रेल्वेला मिळणार वेग; खोळंबलेला प्रकल्प लवकर लागणार मार्गी

Pune Nashik High Speed Railway: जपानच्या साथीने ‘पुणे-नाशिक’ हायस्पीड रेल्वेला मिळणार वेग; खोळंबलेला प्रकल्प लवकर लागणार मार्गी

Pune Nashik High Speed Railway: बऱ्याच काळापासून लालफितीत अडकलेला आणि तांत्रिक कारणांमुळे रखडलेला पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आता एका मोठ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवर आता जपानची नामांकित संस्था ‘जायका’ (JICA) या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढे सरसावली आहे. नारायणगाव येथील ‘खोदड’ रेडिओ टेलिस्कोपच्या तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प इतिहासजमा होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, ‘जायका’च्या एन्ट्रीमुळे या महत्त्वाकांक्षी योजनेला नवजीवन मिळाले आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी २२ मे रोजी केंद्र सरकारची उच्चस्तरीय समिती आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.

जपानी तज्ज्ञांची फौज पुण्यात; काय आहे अजेंडा?
या बैठकीसाठी जपानमधील उच्चपदस्थ अधिकारी आणि तज्ज्ञांचे एक विशेष पथक पुण्यात येत आहे. यामध्ये काझुकी योशिओका, सेईचिरो अकिमुरा, तोशिको सायतो आणि यॉको नकाणो यांसारख्या दिग्गजांचा समावेश असून, ते या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा मांडणार आहेत.

पुणेकरांना आणि राज्याला होणारे मोठे फायदे:

देशाच्या हायस्पीड नेटवर्कशी थेट जोडणी: ‘असोसिएशन ऑफ Friends of Japan’ या संस्थेने पुणे महापालिकेशी संपर्क साधून बैठकीची विनंती केली आहे. त्यांच्या प्रस्तावानुसार, हा मार्ग केवळ पुणे-नाशिकपुरता मर्यादित न राहता अहमदाबाद-मुंबई-पुणे-हैदराबाद या मुख्य बुलेट ट्रेन नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतो.

‘ठाणे-पुणे-नाशिक’ सुवर्ण त्रिकोण: या तीन प्रमुख शहरांना वेगवान रेल्वेने जोडल्यामुळे राज्यात एक नवा आर्थिक आणि औद्योगिक कॉरिडॉर (Economic Triangle) तयार होईल. यामुळे व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना मिळेल.

स्मार्ट स्टेशन आणि एकात्मिक वाहतूक (Multi-Modal Connectivity):

हायस्पीड रेल्वे स्थानकांच्या परिसराचा जागतिक दर्जाचा विकास केला जाईल. केंद्र सरकारचे गृहनिर्माण मंत्रालय आणि ‘जायका’ यांच्या ‘प्रोजेक्ट-स्मार्ट’ अंतर्गत स्टेशन परिसर व्यावसायिक केंद्र म्हणून विकसित होईल. तसेच, प्रवाशांच्या सुविधेसाठी ही रेल्वे यंत्रणा थेट पुणे मेट्रो, पीएमपीएमएल बस सेवा आणि प्रस्तावित रिंग रोडशी जोडली जाणार आहे. थोडक्यात सांगायचे तर जेवढा काळ हा प्रकल्प कागदावर राहिला, आता तेवढ्याच वेगाने तो जपानी तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रत्यक्ष रुळांवर उतरण्याची चिन्हे आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!