Pune PI Transferred: पुणे ग्रामीण पोलीस दलातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी एकाच दिवशी मोठा फेरबदल करत तब्बल ३० पोलीस निरीक्षक (PI) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या (API) तडकाफडकी अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या घाऊक बदल्यांमुळे पुणे ग्रामीण पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या पोलीस ठाण्यांचे कारभारी बदलले
या मोठ्या फेरबदलाचा फटका जिल्ह्यातील अनेक संवेदनशील आणि महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना बसला आहे. यामध्ये सासवड, बारामती तालुका, लोणावळा शहर, रांजणगाव एमआयडीसी, शिरूर, हवेली, यवत, राजगड, जेजुरी, इंदापूर, दौंड, शिक्रापूर आणि भिगवण यांसारख्या प्रमुख पोलीस ठाण्यांमधील प्रभारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची घडी अधिक मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
कोणाची कुठे झाली बदली? खालीलप्रमाणे आहे नवीन नियुक्तीची यादी:
१) नियंत्रण कक्षातून (कंट्रोल रूम) आलेले अधिकारी:
- दत्तात्रय किसन गुंड: नियंत्रण कक्ष ते जुन्नर पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक)
- विनोद भगवान पाटील: नियंत्रण कक्ष ते शिरूर पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक)
- सचिन दिनकर पाटील: नियंत्रण कक्ष ते लोणावळा शहर पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक)
- हेमंत गणपत शेडगे: नियंत्रण कक्ष ते दौंड पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक)
- नारायण विनायकराव पवार: नियंत्रण कक्ष ते बारामती तालुका पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक)
- महेश रामेश्वर स्वामी: नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा, बारामती विभाग (पोलीस निरीक्षक)
- विकास जगन्नाथ भुजबळ: नियंत्रण कक्ष ते सुरक्षा शाखा, पुणे ग्रामीण (पोलीस निरीक्षक)
२) विविध पोलीस ठाण्यांचे नवे प्रभारी (पोलीस निरीक्षक):
- कुमार रामचंद्र कदम: सासवड येथून आता रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे.
- चंद्रशेखर मोहनराव यादव: बारामती तालुक्यातून आता शिक्रापूर पोलीस ठाणे.
- राजेश नारायणराव रामाघरे: लोणावळा शहरातून आता हवेली पोलीस ठाणे.
- संतोष वसंत तासगावकर: आर्थिक गुन्हे शाखेतून आता यवत पोलीस ठाणे.
- विजयमाला महादेव पवार: जिल्हा विशेष शाखेतून आता उरुळी कांचन पोलीस ठाणे.
- संतोष शामराव जाधव: जिल्हा वाहतूक शाखेतून आता राजगड पोलीस ठाणे.
- संतोष श्रीमत घोळवे: टी.एम.सी. मधून आता सासवड पोलीस ठाणे.
- रविंद्र दत्तात्रय पाटील: एफ.आर.ओ. मधून आता जेजुरी पोलीस ठाणे.
- निलेश पांडुरंग माने: वाहतूक शाखा बारामतीमधून आता भोर पोलीस ठाणे.
३) विशेष शाखा आणि मुख्यालयात पाठवण्यात आलेले अधिकारी:
- महादेव नारायण वाघमोडे: रांजणगाव एम.आय.डी.सी. मधून आता आर्थिक गुन्हे शाखा.
- संदेश अरुण केंजळे: शिरूर पोलीस ठाण्यातून आता आर्थिक गुन्हे शाखा.
- वैषाली रावसाहेब पाटील: हवेली पोलीस ठाण्यातून आता महिला कक्ष/भरोसा सेल.
- नारायण शिवाजी देशमुख: यवत पोलीस ठाण्यातून आता एफ.आर.ओ. पुणे ग्रामीण.
- राजेश गणेश गवळी: राजगड पोलीस ठाण्यातून आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग.
- महेश नामदेव मेश्राम: सुरक्षा शाखेतून आता सायबर पोलीस ठाणे.
- गोपाळ बासू पवार: दौंड पोलीस ठाण्यातून आता जिल्हा वाहतूक शाखा.
- दिपरतन गोरख गायकवाड: शिक्रापूर पोलीस ठाण्यातून आता जिल्हा विशेष शाखा.
४) सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या (API) बदल्या:
- नागनाथ गुरुसिद्ध पाटील: वडगाव निंबाळकर ते नियंत्रण कक्ष.
- दिपक भाऊसाहेब वाघचौरे: जेजुरी पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा.
- जिवन शांताराम मोहिते: इंदापूर ते वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे.
- सोमनाथ पांडुरंग शेंडगे: नियंत्रण कक्ष ते भिगवण पोलीस ठाणे.
- कुलदिप दत्तात्रय संकपाळ: स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ते माळेगाव पोलीस ठाणे.
- विनोद जगन्नाथ महांगडे: भिगवण पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी आणि पोलीस दलात नवी ऊर्जा भरण्यासाठी पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याची चर्चा वर्तुळात रंगली आहे. नवनियुक्त अधिकाऱ्यांना तातडीने आपापल्या पदभाराचा ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


