Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विधान परिषदेत महायुतीचा दबदबा! 17 पैकी 16 जागांवर विजय; नाशिकमध्ये गोकुळ गितेंनी घडवला मोठा उलटफेर

विधान परिषदेत महायुतीचा दबदबा! 17 पैकी 16 जागांवर विजय; नाशिकमध्ये गोकुळ गितेंनी घडवला मोठा उलटफेर

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, राज्यातील 17 पैकी तब्बल 16 जागांवर महायुतीने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

निवडणुकीपूर्वीच 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. उर्वरित 11 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर झाला.

विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागांचा निकाल

ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध)
रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध)
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध)
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार
भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप
सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप
परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना
सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप
धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप
नागपूर- राजीव पोतदार, भाजप
जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप
अमरावती- प्रवीण पोटे, भाजप
नांदेड- अमर राजूरकर, भाजप

नाशिकमध्ये महायुतीला धक्का

या निवडणुकीतील सर्वात मोठी चर्चा नाशिक मतदारसंघाची ठरली. महायुतीच्या संख्याबळानंतरही अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवत राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्यचकित केले. या निकालामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि क्रॉस व्होटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

मतदानाची टक्केवारी

नाशिक – 100 टक्के
भंडारा-गोंदिया – 100 टक्के
सांगली-सातारा – 99.89 टक्के
परभणी-हिंगोली – 99.78 टक्के
सोलापूर – 99.68 टक्के
धाराशिव-लातूर-बीड – 99.49 टक्के
छत्रपती संभाजीनगर-जालना – 98.90 टक्के
नागपूर – 98.44 टक्के
जळगाव – 97.78 टक्के
अमरावती – 94.68 टक्के

महाविकास आघाडीला मोठा फटका

या निकालातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवत महायुतीने आपले संघटनात्मक वर्चस्व सिद्ध केले, तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. नाशिकचा अपवाद वगळता राज्यभर महायुतीची एकतर्फी सरशी पाहायला मिळाली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!