Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक! मूल होत नाही म्हणून पत्नीवर तहसीलदाराकडून जादूटोणा; आता थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी

धक्कादायक! मूल होत नाही म्हणून पत्नीवर तहसीलदाराकडून जादूटोणा; आता थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी

नांदेड : मूल होत नाही म्हणून पत्नीला मानसिक त्रास देऊन जादूटोणा व अघोरी उपचार केले. सतत मानसिक व शारीरिक छळ करून दोन वेळा कानशिलावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अखेर तहसीलदार पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल करून शिवाजीनगर पोलिसांनी पतीला अटक केली. रविवार, १३ रोजी दुपारी पतीला न्यायालयात हजर केले असता, दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपी तहसीलदाराची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपी असलेला तहसीलदार हा चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असून, पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तहसीलदारासह दोन ‘डॉक्टर, सासू, सासऱ्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तहसीलदार हा नांदेडला आल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांचे पथक त्याच्या घरी जाऊन धडकले व आरोपीला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत आरोपीची चौकशी करून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

समोर आलेल्या माहितीनुसार, अविनाश शेंबटवाड हा चंद्रपूर जिल्ह्यात तहसीलदार पदावर कार्यरत आहे. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. तेव्हापासून पती-पत्नीत कौटुंबिक वाद सुरू होता. अनेकदा त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. पत्नीसह अविनाश शेंबटवाड यांना नातेवाईकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यात फरक पडला नाही. दारू पिऊन मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्यासाठी मानसिक छळ करणे, नेहमी बळजबरी करणे आदीसह अन्य गंभीर आरोप असल्याचे तक्रारीत नमूद केल्याचे सांगण्यात आले.

दंडाधिकारी म्हणून सतत दबाब

मूल होत नाही म्हणून मानसिक त्रास देऊन जादूटोणा केल्याचा आरोपही पत्नीने तक्रारीत केला आहे. मी दंडाधिकारी असल्याने माझ्याविरुद्ध कुठेही तक्रार दे, काहीच होत नाही, असा नेहमी दबाव टाकून मारहाण करत असे. गंभीर बाब म्हणजे पतीने दोन वेळा कानशिलावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार तिने दिली आहे. दरम्यान, पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अविनाश शेंबटवाड याच्यासह दोन डॉक्टर, सासू, सासरे व इतर जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम १०९, ७४, ७५, ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२, ३, ५ याचबरोबर नरबळी, अमानुष अघोरी जादूटोणा प्रतिबंध तसेच पिस्तूल रोखल्याप्रकरणी शस्त्र अधिनियम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे करीत आहेत.

तीन नोटिसा पाठवल्या

तहसीलदार व त्यांच्या पत्नीत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सदरचे प्रकरण सुरुवातीला पोलीस दलातील महिला कक्षाकडे गेले होते. दोघांमध्ये समेट करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. यासाठी दोन-तीन नोटिसाही पाठविण्यात आल्या; परंतु तहसीलदार हजर राहिला नसल्याने अखेर पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून १२ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शनिवारी रात्री आरोपी तहसीलदार याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली व रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!