Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हातबॉम्बची विक्री प्रकरणात तरुणाला कारावासाची शिक्षा

हातबॉम्बची विक्री प्रकरणात तरुणाला कारावासाची शिक्षा

पुणे : हातबॉम्बची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला न्यायालयाने शुक्रवारी (दि. १८) दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कैदेबरोबरच त्याला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. विकी अशोक सावंत (वय २४, रा. शिवकृपा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) हे आरोपीचे नाव आहे. वाकड पोलिसांच्या पथकाने ९ सप्टेंबर २०१५ ला सावंत याला थोपटे लॉन परिसरात संशयावरून ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याकडे हातबाँम्ब असल्याचे आढळले. त्यानंतर बॉम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) घटनास्थळी पाचारण करण्यात आली. बीडीडीएसच्या पथकाने सावंतकडून बॉम्ब ताब्यात घेतला. त्याच्याकडील हातबॉम्ब गावठी बनावटीचा असल्याचे तपासणीत आढळले. याबाबतचा अहवाल पोलिसांकडे देण्यात आला.

सावंत याच्याविरुद्ध बेकायदा हातबॉम्ब बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून या खटल्यात नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. तपास अधिकारी, तसेच बॉम्बशोधक नाशक पथकातील अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली, साक्षी व पुरावे ग्राह्य धरुन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी सावंत याला शिक्षा सुनावली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!