Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मंत्रालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनंतर छत्तीसगडच्या उद्योजकाला घातला कोटींचा गंडा बारामतीच्या लखोबा लोखंडेचे अनेक प्रताप उघड

मंत्रालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनंतर छत्तीसगडच्या उद्योजकाला घातला कोटींचा गंडा बारामतीच्या लखोबा लोखंडेचे अनेक प्रताप उघड

पुणे : बारामतीच्या लखोबा लोखंडेने मंत्रालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनंतर छत्तीसगडमधील काही उद्योजकांनादेखील कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत आता छत्तीसगडच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल झाली असून, या लखोबाला म्हणजे आनंद सतीश लोखंडे (२८) आणि त्याची बहीण विद्या सतीश लोखंडे (२४, दोघेही रा. जळोची, ता. बारामती) यांना येत्या २ मे रोजी प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश छत्तीसगड पोलिसांनी दिले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात उद्योजक आणि मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

बारामतीत डेअरी फर्मसह विविध कंपन्या स्थापन करून आपण फार मोठे उद्योजक असल्याचे भासवून बारामतीच्या लखोबा लोखंडेने मंत्रालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांना आपल्या व्यवसायात गुंतवणूक करायला लावून त्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याबाबत मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेकडे या बड्या अधिकाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. यामध्ये आनंद लोखंडे लोखंडे आणि विद्या लोखंडे यांच्याविरोधात यापूर्वी १० कोटी २१ लाख ५९ हजार ३६७ रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

आता लखोबा बहीण भावाने गेल्या वर्षी २०२४ मध्ये छत्तीसगडमधील रायपूरच्या आनंद इंडस्ट्रीजचे मालक प्रार्थी शंकर नाथानी यांना संपर्क करून २५ मेट्रिक टन गायीचे लोणी खरेदी करण्याचे आमिष दाखवून माल उचलला. मात्र, दरवेळी पेमेंट नंतर देण्याचे सांगत पैसे दिलेच नाही. या उद्योजकाने आपली १ कोटी ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर छत्तीसगड आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे, याबाबत येत्या २ मे रोजी चौकशी होणार आहे. तर अशाच प्रकारे आनंद लोखंडे याने पुणे शहरातील सैन्य दलाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला फ्लॅट देण्याच्या आमिषाने दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, केवळ चौकशीच्या पुढे कोणतीच कारवाई होत नसल्याने या लखोबाला कोण वाचवतंय, असा सवाल उपस्थित होत आहे.

पुढाऱ्याच्या वरदहस्तामुळे कारवाई होईना

बारामती तालुक्यातील नेत्याची जवळीक सांगून अनेकांना गंडवणाऱ्या आनंद लोखंडे याच्याविरोधात पुणे, मुंबई तसेच इतर वेगवेगळ्या राज्यांत तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, या लखोबाचा जबाब घेण्यापुढे कोणतीच कारवाई होत नाही. काही नेत्यांची नावे सांगून तो आपण काहीच केले नाही, अशा अविभार्वात वावरत आहे. हा लखोबा एका राजकीय पुढाऱ्याच्या मोठ्या कंपनीचे लेटर दाखवून वेगवेगळ्या उद्योजक आणि बड्या अधिकाऱ्यांना गंडा घालत आहे. त्यामुळे एक दिवस लखोबाबरोबर तो पुढारीदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!