पुणे : पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या 112 या क्रमांकावर आज सकाळी आला. धमकीच्या या फोनने खळबळ उडाली आहे. यानंतर पुणे पोलिसांकडून रेल्वे स्टेशन परिसरासह विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ‘पुणे रेल्वे स्थानक, येरवडा आणि भोसरी या परिसरात बॉम्बस्फोट घडवण्यात येणार आहे ‘अशी धमकी फोनवरून दिली . त्यानंतर याबाबत बंड गार्डनर पोलीस स्थानकाला माहिती कळवण्यात आली. पुण्यातील बंड गार्डन पोलीस आणि सीआरपीएफ रेल्वे पोलीस यांनी शोध मोहीम राबवली असता रेल्वे स्थानक परिसरात कसल्याही संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाहीत.
दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.


