Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धमकी देऊन लावले लग्न; अल्पवयीन पत्नीचा हुंड्यासाठी छळ

धमकी देऊन लावले लग्न; अल्पवयीन पत्नीचा हुंड्यासाठी छळ

बार्शी : शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या आईला धमकी देत, तुझ्या मुलीसोबत लग्न करायचे आहे, नाही केल्यास तिला पळवून नेईन, असे म्हणत लग्न लावल्यानंतर संबंधित मुलीचा पती व सासरच्या मंडळींनी हुंडा, मानपान आणि घरकामाच्या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप पीडित अल्पवयीन विवाहितेने केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडितेचे सध्याचे वय १७ वर्ष ५ महिने असून पीडिता दोन वर्षापूर्वी शिक्षण घेत असताना ती अल्पवयीन आहे हे माहीत असूनही पवन राजकुमार गायकवाड याने पीडितेच्या आईस तुझ्या मुलीसोबत लग्न करायचे आहे, नाही केल्यास तिला पळवून नेईन, अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या आईने नातेवाईकांना सोबत घेऊन लग्न जमविण्यासाठी बोलले असता संबंधित मुलाच्या आई व वडिलांनी आम्हाला फक्त नारळ द्या, बाकी काही नको, लग्न आम्ही करतो, अशी मागणी केली.

त्यानंतर दोन वर्षापूर्वी दि. २९ मे २०२३ रोजी मोजक्या पाहुण्यात लग्न झाले. दरम्यान, एक महिन्यानंतर सासू-सासरे तसेच पतीने लग्नात मानपान केला नाही, तुला फुकट घरात घेतलंय, तुला काम येत नाही, म्हणून मारहाण व छळ सुरू केला. तसेच सणावाराला आल्यानंतर नणंद कोमल ही घालून पाडून पीडितास बोलत असे. तुझ्या पोटातील मूल आम्हाला नको, असे म्हणून लाथांनी पोटावर, हाताने मारहाण करून पीडितेला माहेरी हाकलून दिले. पोटावर मारहाण केल्याने दुसऱ्या दिवशी पोटात दुखून घरीच गर्भपात झाला.

तेव्हापासून पीडिता माहेरी आईकडे राहण्यास असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. यावरून पती पवन राजकुमार गायकवाड, सासू अलका राजकुमार गायकवाड व सासरा राजकुमार कुंडलिक गायकवाड (तिघे रा. आगळगाव, ता. बार्शी), नणंद कोमल राहुल पौळ (रा. निरवांगी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!