Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तूर्त तरी पुण्यासाठी स्वतंत्र पालिका नाही; उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले स्पष्ट

तूर्त तरी पुण्यासाठी स्वतंत्र पालिका नाही; उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले स्पष्ट

पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट असलेल्या गावांच्या विकासासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पुणे महापालिकेचे विभाजन करून नव्याने हडपसरसाठीची महापालिका तयार करण्याचा तुर्त तरी कोणताही प्रस्ताव शासनाकडे नसल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे विधान परिषदेचे सदस्य योगेश टिळेकर यांनी पुण्यातील नागरी सुविधांबाबत मुद्दा उपस्थित करत सरकारला काही प्रश्न विचारले. आ. टिळेकर म्हणाले की, नागरी सुविधा पुरविण्यात पुणे महानगरपालिका ही अपयशी ठरत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर हडपसर-मांजरी- वाघोलीसाठी एक वेगळी स्वतंत्र महानगरपालिका तयार करण्यात यावी. सुमारे दोन वर्षापूर्वीच पुणे महानगरपालिका ही राज्यात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेली एकमेव पालिका झाली आहे. त्यामुळे सर्वच नागरी सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाकडे या मागण्यांकडे लक्ष द्यावे.

पुणे महानगरपालिकेवरील वाढता ताण आणि पूर्व पुण्यातील उपनगरांच्या समस्या सोडवण्यासाठी, हडपसर-मांजरी-वाघोलीसाठी स्वतंत्र महानगरपालिकेच्या निर्मितीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या भागाची लोकसंख्या आणि आर्थिक क्षमता पाहता खऱ्या अर्थाने तातडीने नवीन पालिका होणे गरजेचे असल्याचे टिळेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना सध्या तरी पुण्यासाठी स्वतंत्र पालिका तयार करणे शक्य नाही परंतु, नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांना लागेल तेवढा निधी दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत झालेल्या चर्चेवरुन आणि सरकारकडून मिळालेल्या उत्तरावरुन तूर्त तरी हडपसर महापालिकेच्या निर्मितीचे घोंगडे भिजत पडल्याचे दिसून येत असून, आगामी निवडणुका सध्याच्या रचनेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!