Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पालकांनो सावधान! वाढदिवसाच्या केकमध्ये निघाल्या धातूच्या पिन; 3 वर्षांच्या चिमुरड्याच्या जीवावर बेतला प्रसंग

पालकांनो सावधान! वाढदिवसाच्या केकमध्ये निघाल्या धातूच्या पिन; 3 वर्षांच्या चिमुरड्याच्या जीवावर बेतला प्रसंग

Thane News : लहान मुलांच्या वाढदिवसासाठी आकर्षक थीम केक मागवण्याचा ट्रेंड वाढत असताना ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या केकमधील धातूच्या पिन चॉकलेट समजून गिळल्याने तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आली. सुदैवाने डॉक्टरांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने आपल्या तीन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त स्पायडरमॅन थीम केक ऑर्डर केला होता. केकवरील सजावटीला आधार देण्यासाठी बेकरीकडून धातूच्या तीक्ष्ण तारा वापरण्यात आल्या होत्या. मात्र, याबाबतची कोणतीही माहिती पालकांना देण्यात आली नव्हती.

वाढदिवसानंतर केक खात असताना चिमुरड्याने त्या धातूच्या पिन चॉकलेट समजून गिळल्या. हा प्रकार लक्षात येताच पालकांनी तातडीने मुलाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या एक्स-रेमध्ये धातूच्या पिन मुलाच्या आतड्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती.

डॉक्टरांनी मुलावर बारकाईने लक्ष ठेवले. अखेर जवळपास 48 तासांच्या निरीक्षणानंतर त्या धातूच्या तारा नैसर्गिकरित्या शरीराबाहेर पडल्या आणि मुलाचा जीव वाचला. या घटनेमुळे पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी या प्रसंगाचा मानसिक धक्का कुटुंबाला बसला आहे.

माहितीनुसार, ठाण्यातील जीवशास्त्र शिक्षिका स्नेहा शेलार यांच्या तीन वर्षांच्या रेयांशसोबत हा प्रकार घडला. सुदैवाने कोणतीही शस्त्रक्रिया न करता मुलाची प्रकृती स्थिर राहिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!