Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दैवाचा क्रूर खेळ! एका अपघाताने उद्ध्वस्त झाली दोन लग्नघरे; वरपित्यांसह होणाऱ्या नवदाम्पत्याचाही मृत्यू

दैवाचा क्रूर खेळ! एका अपघाताने उद्ध्वस्त झाली दोन लग्नघरे; वरपित्यांसह होणाऱ्या नवदाम्पत्याचाही मृत्यू

Jalgaon Accident : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे मार्गावर झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका बाजूला मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना वरपिता आणि वरमाय यांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या बाजूला काही दिवसांत विवाहबंधनात अडकणार असलेल्या तरुण-तरुणीचाही जागीच अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे.

मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळजवळ हॉटेल वृंदावन परिसरात हा भीषण अपघात घडला. धुळ्याकडून अमळनेरकडे येणाऱ्या कारची समोरून येणाऱ्या एसटी बस आणि दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

व्यारा (गुजरात) येथील सुरेश महाजन आणि अनिता महाजन यांच्या मुलाचे १९ जून रोजी लग्न होणार होते. त्याचबरोबर कुटुंबातील आणखी एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आणि लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी महाजन कुटुंब अमळनेरकडे निघाले होते. मात्र, नियतीने वेगळेच काही ठरवले होते. या अपघातात सुरेश महाजन, अनिता महाजन, नंदलाल महाजन आणि निर्मला महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालवणारा त्यांचा पुतण्या गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याच अपघातात पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले नीलेश तावडे आणि सोनल जावरे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दोघांचे लग्न ठरले होते आणि ते भविष्यातील आयुष्याची स्वप्ने रंगवत दुचाकीवरून प्रवास करत होते. मात्र, समोरून आलेल्या कारच्या जोरदार धडकेमुळे त्यांची दुचाकी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि दोघांनीही जागीच प्राण गमावले.

अवघ्या काही दिवसांवर आलेले लग्न, आनंदाचे वातावरण आणि नव्या आयुष्याची स्वप्ने एका क्षणात संपुष्टात आली. या भीषण दुर्घटनेमुळे दोन कुटुंबांचे आनंदाचे क्षण कायमचे हिरावले गेले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!