Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Rain Update: पुणेकरांची प्रतीक्षा संपणार! ‘या’ दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची एन्ट्री; हवामान विभागाचा नवा अंदाज

Pune Rain Update: पुणेकरांची प्रतीक्षा संपणार! ‘या’ दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची एन्ट्री; हवामान विभागाचा नवा अंदाज

Pune Rain Update: महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून वेगाने पुढे सरकत असून मंगळवारी त्याने सोलापूर आणि आसपासच्या दक्षिण भागांमध्ये धडक दिली आहे. पुढील ४८ तास मान्सूनच्या वाटचालीसाठी अत्यंत पोषक असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. मात्र, पुणे शहरात अधिकृत मान्सून पोहोचण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी लागणार असला, तरी पुणेकरांना लवकरच उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

यंदा जून महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पुणेकरांना पावसाने हुलकावणी दिली आहे. सामान्यतः १ ते १० जून दरम्यान शहरात सरासरी ४९ मिमी पाऊस पडतो, ज्यामध्ये मान्सूनपूर्व (वळवाच्या) पावसाचा वाटा मोठा असतो. पण यंदा जून उजाडला तरी पुण्याची पावसाची नोंद चक्क ‘शून्य’ आहे. याउलट गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यात पावसाने धुवांधार बॅटिंग केली होती. यंदा मे महिन्यातही मोजकाच पाऊस पडल्याने आणि जूनच्या सुरुवातीलाही कोरडे हवामान असल्याने पुणेकर पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

हवामानात बदल: उकाड्यापासून किंचित दिलासा
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला असला, तरी मुख्य शहरात मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात दुपारनंतर गार वारे सुटत असल्याने नागरिकांना कडक ऊन आणि घामाच्या धारांपासून थोडा आराम मिळाला आहे. संध्याकाळच्या वेळी आकाश ढगाळ होत असल्याने हवामान आल्हाददायक वाटत असले, तरी रात्रीचे तापमान अजूनही सरासरीपेक्षा जास्त असल्याने रात्रीचा उकाडा कायम आहे.

पुण्यात कधी बरसणार पाऊस? आयएमडीचा अंदाज 
“पुढील दोन दिवसांत पुण्याच्या हवामानात लक्षणीय बदल पाहायला मिळतील. कमाल तापमानात किंचित घट होईल आणि दुपारनंतर ढगांची गर्दी होऊ लागेल. विशेषतः गुरुवारनंतर शहरात ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाची जोरदार हजेरी लागेल,” अशी माहिती ‘आयएमडी’चे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!