Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अट मान्य करा अन्यथा मालिका रद्द केली जाईल; पाकिस्तानची वेस्ट इंडिजला धमकी

अट मान्य करा अन्यथा मालिका रद्द केली जाईल; पाकिस्तानची वेस्ट इंडिजला धमकी

कराची: पाकिस्तानचा संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी तो यजमान संघाकडून टी-20 आणि वनडे मालिका खेळणार होता, पण यादरम्यान पाकिस्तानने वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला. वेस्ट इंडिजसमोर त्याने एक नवी अट घातली आहे. ही अट मान्य न केल्यास मालिका रद्द करण्याचा इशारा त्याने दिला आहे. पाकिस्तानचा हा दौरा १ ऑगस्टपासून सुरू होणार होता, पण आता या दौऱ्यावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे क्रिकेट खेळायचे नाही. त्याने वेस्ट इंडिज बोर्डाला ही माहिती दिली आहे.

पाकिस्तानने काय धमकी दिली?
पाकिस्तानचा संघ १ ते १२ ऑगस्ट दरम्यान अमेरिका आणि कॅरेबियन बेटांचा दौरा करणार आहे. यावेळी तो वेस्ट इंडिजकडून तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार होता, पण आता पाकिस्तानला फक्त टी-२० सामने खेळायचे आहेत. त्याने वनडे खेळण्यास नकार दिला आहे.

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेस्ट इंडिजला धमकी दिली आहे की, जर त्यांनी ऑगस्टमध्ये एकदिवसीय सामन्यांऐवजी टी-20 सामने खेळले नाहीत तर त्यांना इतर पर्यायांचा विचार करावा लागेल. तर यजमान संघाचे म्हणणे आहे की, “वेळापत्रक तसेच राहील”. त्यामुळे आता या दौऱ्यावर संकटाचे ढग दाटून आले आहेत.

वेळापत्रकात बदल होणार नाही
टी-20 मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान आग्रही आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचे रूपांतर टी-२० मालिकेत व्हावे, अशी त्याची इच्छा आहे. वेस्ट इंडिजसमोर त्याने आपलं मत मांडलं असून वेळापत्रकात बदल न केल्यास इतर पर्यायांचा विचार करू शकतो, असा इशारा दिला आहे.

मात्र क्रिकेट वेस्ट इंडिजने (सीडब्ल्यूआय) सांगितले की, चर्चा सुरू असून वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही. सीडब्ल्यूआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस डेहरिंग म्हणाले की, वेळापत्रक पूर्वीसारखेच राहील. याबाबत पीसीबीशी आम्ही वाटाघाटी करत राहू.

वनडे क्रिकेट खेळण्यासाठी वेस्ट इंडिज उत्सुक
वेस्ट इंडिज क्रिकेट संघ अलीकडच्या काळात एकदिवसीय सामने खेळला नसल्यामुळे सध्या वनडे खेळण्यास उत्सुक आहे. 2023 च्या वनडे विश्वचषकासाठी पात्र ठरविण्यात अपयशी ठरल्यानंतर वेस्ट इंडिजने आता 50 षटकांच्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तर पाकिस्तानला पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून अधिक टी-२० सामने खेळायचे आहेत. यंदा फेब्रुवारी २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत टी-२० विश्वचषक होणार आहे. पाकिस्तान आता सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे.

वेळापत्रक काय आहे?
पहिला टी-२० सामना : १ ऑगस्ट (लॉडरहिल) दुसरा टी-२० सामना: ३ ऑगस्ट (लॉडरहिल) तिसरा टी-२० सामना: ४ ऑगस्ट (लॉडरहिल) पहिला एकदिवसीय सामना: ८ ऑगस्ट (तारुबा) दुसरा एकदिवसीय सामना: १० ऑगस्ट (तारुबा) तिसरा एकदिवसीय सामना: १२ ऑगस्ट (तारुबा)

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!