पुणे : पुणे परिसर व जिल्हयात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, पुढील चार दिवस शहरात अतिहलक्या व हलक्या पावसाची शक्यता आहे. घाट विभागात यलो अलर्ट असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेले काही दिवस तुरळक सरी वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्हयाच्या काही भागात ऊन, ढगाळ हवामान व हल क्या व मध्यम सरी असे वातावरण पाहायला मिळत आहे.
शनिवारी (दि. १९) सायंकाळपासून भोर येथे ९.५ मि.मी, कुरवंडे ८.५, निमगिरी ३, हडपसर २, हवेली २, कोरेगाव पार्क १.५, लवळे १,५, तळेगाव १, लोहगाव ०.६ तर मगरपट्टा येथे ०.५ मि.मी पावसाची नोंद झाली. शहरातील तापमानात चढउतार होत असून कमाल तापमान २९.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस नोंदविले आहे.


