मेष : आनंदी रहाल, आजचा दिवस आपल्याला आर्थिकदृष्ट्या विशेष अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : आरोग्य सुधारेल. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता संपेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम असणार आहे. अनेक बाबतीत आपल्याला अनुकूलता लाभेल.
मिथुन: मनोबल कमी असल्याने आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. प्रवास आज नकोत.
कर्क: प्रियजन भेटणार आहेत. तुमच्या विचारांची दिशा योग्य राहील. मानसिक प्रसन्नता देणारी घटना घडेल, आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभ होईल. प्रवास सुखकर होतील.
सिंह: तुम्ही सर्वत्र आपले वर्चस्व राखाल. आपले तेच खरे कराल. सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आत्मविश्वास वाढणार आहे.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सुयश लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. गेले दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल.
तुळ : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना अनावश्यक चिंता सतावतील. आरोग्याच्या तक्रारी राहतील. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. आज कोणतीही महत्त्वाची कामे नकोत.
वृश्चिक : मनोबल वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.
धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. आज काहींना एखाद्या बाबतीत मनस्ताप संभवतो.
मकर : महत्त्वाचे निर्णय घ्याल कामाचा ताण कमी राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. सार्वजनिक कामात अग्रेसर रहाल. आरोग्य सुधारेल.
मीन: जिद्दीने कार्यरत रहाल. आरोग्य उत्तम राहील, चिकाटीने दैनंदिन कामे पूर्ण कराल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. भाग्यकारक अनुभव येतील. मनोबल वाढेल.


